रविवार, ८ सप्टेंबर, २०१३

समाजावर बोलू काही

श्री स्वामी समर्थ .
गणेश चतुर्थी च्या सर्वाना  शुभेच्या.
आज गणेश चतुर्थी, संपर्ण महाराष्ट्रात उस्तहाचे वातावरण असणार. आता पुढचे १० दिवस तरी वैयक्तीक आणि सामाजिक प्रश्नांचा विसर पडणार.

आज संपूर्ण देश विचित्र फेज मधून चालला आहे. रुपया पडतो आहे महागाई प्रचंड वाढत आहे. सरकारला शिव्या घातल्या जात आहेत. सरकार म्हणजे कोण ? ही कोण लोक ? आजच्या दुर्दशेला फक्त सरकारच जबाबदार कसे ?

भ्रष्टाचार तर समजातल्या सर्व प्रोफेशन मध्ये रुजला आहे. सरकारी ऑफिस मध्ये याची पाउला पाउला ला प्रचीती येते . साधे रेशन कार्ड किवा पासपोर्ट काढताना घाम फुटतो . कित्येक डॉक्टर्स ,पोलिस ,इंजिनीयर्स ,बँक अधिकारी यांच्यावर  सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप होतच असतात. ही  कोण लोक? जनताच ना .
याच्या शिवाय छोटे मोठे उद्योजक  income tax. चूकवत असतात. रीक्षावाले मीटर प्रमाणे येत नाहीत.  शाळा कॉलेज मध्ये donation . ही कोण लोक? जनताच ना.
आज औषधा पासून दुधा  पर्यंत सर्व सर्वच गोष्टीत भेसळ. पूर्वी हातभट्टी वरची विषारी दारू पिऊन माणस मेल्याचे ऐकले होते. आज पेढे , शाळेत मिळणारी खिचडी खाऊन माण सं  मरत आहेत. हॉस्पिटल मध्ये मिळणाऱ्या ग्लुकोज च्या बाटल्यां मध्ये साधेच पाणी . लहान बाळानां दिल्या जाण्याऱ्या vaccination मध्ये acid. ATM मधून काढलेल्या नोटा भारतीय रिजर्व बँकेने छापल्या की पाकिस्तान ISI ने हे समजत नाही.
खरच भीषण परिस्थिती आहे . हे सर्व करणारी लोक कोण ?

न्याय व्यवस्था नावाची एक व्यवस्था भारतात आहे पण तिची अवस्था फारच बिकट आहे . तिला कोणीच घाबरत नाही. कलमाडी ,राजा भ्रष्टाचार करून आरोप सिद्ध होऊन सुद्धा पुन्हा मंत्री . आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली,  नवीन घटना लिहिली.  आज तीच भारतीय राज्यघटना जाळण्याची  वेळ आली  आहे.
  
हे बदलण्या साठी प्रयत्न सुद्धा झाले. अण्णा  हजारे , रामदेव बाबा यांना सध्याच्या सरकारने  भिक घातली ना ही .
जर फक्त सरकारच ही परिस्थिती बदलू शकत असेल  तर मग, निष्क्रिय सरकारच का पुन्हा निवडून येते?
हे सरकार निवडून देणारी जनताच ना ?आपण देशासाठी मतदान करतो की आपल्या जातीसाठी?

IAS, IPS अधिकारी काय काम करतात. त्यांचा सरकारवर वचक का नाही?फक्त चांगला पगार मिळतो म्हणून IAS ,IPS होतात की  देशा साठी ?

नवीन सरकार आले तर ही परिस्थिती बदलेल का ? समाजात खोलवर गेलेला भ्रष्टाचार ,निर्ल्लज पणा दूर होईल का ?

मला रामदेव बाबा यांचेच विचार सध्याच्या परिस्थिती बदलण्या जास्त योग्य वाटतात . नवीन कायदे आणण्या आधी समाज जागृती झाली पाहिजे.
आज रामदेव बाबांच्या कामाची  तुलना मला, छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळात महाराष्ट्र धर्म निमिर्मिती साठी रामदास स्वामींनी केलेल्या कार्याशी कारावीशी वाटते.

 सध्या आपण रामदेव बाबांच्या विचारांना follow करूया